तहसीलदार विजय साळवे यांचे आवाहन

वाशिम प्रतिनिधी, दि.१० :- मतदार यादीतील दुबार नावे वगळून मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ११ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील १५० आणि शहरी भागातील ५९ अशा एकूण २०९ मतदान केंद्रावर तसेच तहसील कार्यालय वाशिम येथे निवडणूक शाखेत मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे.
तरी मतदारांनी त्यांच्याशी संबंधित मतदान केंद्राला किंवा तहसील कार्यालय,वाशिम येथील निवडणूक शाखेला भेट देऊन मतदार ओळखपत्राला आधार क्रमांकाशी जोडावे,असे आवाहन वाशीमचे तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.