परभणी तालूक्यातील मौजे राहटी येथील अवैध रेती साठ्याचा जाहीर लिलाव

परभणी प्रतिनिधी, दि.१० :- परभणी तालुक्यातील मौजे राहटी येथील अंदाजे ६०७ ब्रास जप्त केलेल्या अवैध रेती साठ्याचा दि. १३ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय कार्यालय, परभणी येथे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या रेती साठ्यासाठी ज्यांना लिलावात भाग घ्यावयाचा आहे, त्यांना अटी व शर्तीस अधीन राहून लिलावात सहभागी होता येईल. अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

जप्त रेती साठ्यातील रेती खरेदीसाठी लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास इच्छुकांना दि. १३ सप्टेंबर, २०२२ रोजी अटी व शर्तीच्या अधिन राहून लिलावात बोली बोलता येईल. सरकारी किमतीच्या एक चर्तुर्थांश रक्कम लिलाव सुरु होण्यापुर्वी लिलावात भाग घेणाऱ्यांकडून घेण्यात येईल. लिलावधारकांना रेती वाळूसाठा जेथे आहे व जसा आहे अशा स्थितीतच घ्यावा लागेल. सदरील रक्कम भरणा केल्याशिवाय लिलाव अंतीम केला जाणार नाही. लिलाव झालेल्या दिवसापासून एका महिन्याच्या आत स्वखर्चाने वाळुसाठा ठिकाणावरुन उचल करावा लागेल.

लिलाव धारकांने संपुर्ण रक्कम भरावी लागेल. शासन आदेशानुसार जीएसटी कराचा भरणा करणे बंधनकारक असेल. बोली लावून साठा घेवून संपुर्ण रक्कम भरणा न केल्यास संबंधितांविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. अपेक्षित रेतीसाठ्याच्या प्रमाणात वाहतूक पासेस लिलावधारकास दिल्या जातील. विहीत कालावधीत साठ्याची उचल न केल्यास फेरलिलाव करण्यात येईल. जशास तशा स्थितीमध्ये रेतीसाठा घ्यावा लागेल. लिलावात भाग घेणाऱ्यांकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची १० टक्के रक्कम जमा करावी लागेल.

 

 

 

साठवणूक केलेल्या वाळु साठयाच्या जागेचा अकृषिक कर भरणा करणे आवश्यक राहील. कार्यालयाच्या दर्शविलेल्या पत्त्यावर लिलावात बोली बोलणाऱ्यांची जबाबदारी राहील. लिलाव अंशत: अथवा पुर्णत: रद्द करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी, परभणी यांचे राहतील. रेती साठ्याची रक्कम भरणा केल्यानंतर ३ दिवसात रेती वाहतुक पासेसकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांच्याकडून वाहतुक पासेस हस्तगत करावेत. कोविड-१९ च्या प्रार्दुभावामुळे स्वत: मास्कचे परिधान करुन उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग नियम पाळावेत. तसेच वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *