क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकाऱ्यांची मुलाखतीद्वारे होणार निवड

नांदेड प्रतिनिधी,दि. १३ :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी यांची मुलाखात घेण्यात येणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी विहित नमून्यात अर्ज भरून गुरूवार २२ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर नांदेड येथे थेट मुलाखातीसाठी उपस्थित राहावे. सोबत बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र, सेवामुक्ती प्रमाणपत्र घेऊन यावेत असे अधिक्षक डाकघर नांदेड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

उमेदवारांना अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड येथे उपलब्ध होईल. उमेदवाराचे वय मुलाखातीच्या दिवशी जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. अर्जदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याचा निवृत्त अधिकारी / कर्मचारी असावा. तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारची विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू नसावी. उमेदवाराची निवड थेट मुलाखातीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

 

 

निवड झालेल्या उमेदवारास रूपये पाच हजार अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी किंवा केव्हीपी स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल.

जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रूपांतरीत केली जाईल. परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. उमेदवाराची नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे अधीक्षक डाकघर नांदेड विभान नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *