महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ यांच्याहस्ते राष्ट्रध्वज व विद्यापीठ ध्वजारोहन
देगलूर प्रतिनिधी, दि १९ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीदिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ यांच्याहस्ते राष्ट्रध्वज व विद्यापीठ ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी एन. सी.सी. विभागाच्यावतीने डॉ. नीरज ऊपलंचवार यांनी मानवंदना दिली.
या निमित्य लोकप्रशासन , हिंदी राज्यशास्त्र विभागाच्यावतीने मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्य भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. याद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास , स्वामी रामानंद तीर्थ यांचा जीवन परिचय व मराठवाडा मुक्ती संग्रामातील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
लोकप्रशासन विशेषांकाचे प्रकाशन अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी विभागाच्या विशेष अंकाचे प्रकाशन अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे यांच्याहस्ते करण्यात आले तर राज्यशास्त्र विभागाच्या भितीपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार , कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री जनार्धन चिद्रावार, श्री चंद्रकांत नारलावार, , रवींद्र अप्पा द्याडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, उपप्राचार्य निवृती गोविंदवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. बी.आर.कतुरवार, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ आर बी लक्षटे , हिंदी विभागप्रमुख डॉ संतोष येरावार , डॉ माधव चोले, डॉ. एस.एम.देबडे व डॉ ख़ंदकुरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.