बुलडाणा प्रतिनिधी, दि. २२ :- विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्र उघडावेत, यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात समान संधी केंद्र उघडण्याबाबत बैठक पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश जी वानखडे उपस्थित होते. बैठकीत ज्या महाविद्यालयांनी समान संधी केंद्र उघडलेले नाहीत, अशा महाविद्यालयांनी हे केंद्र तातडीने उघडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच महाविद्यालयस्तरावरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
श्री. वानखेडे यांनी जात पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अर्ज तपासणीसाठी महाविद्यालयस्तरावर तालुकानिहाय कॅम्प घेण्यात येणार असल्याचे सांगितले. श्रीमती राठोड यांनी स्वाधार योजना, वसतीगृह प्रवेश, तसेच वृद्धाश्रमाबाबत माहिती दिली.