देगलूर प्रतिनिधी, दि.२५:- देगलूर महाविद्यालय देगलूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने काल २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्राचार्य डॉ. मोहन खताळ (देगलूर महाविद्यालय देगलूर) प्रमुख उपस्थिती- डॉ. अशोक टिपरसे (व्यवस्थापन परिषद सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) प्रमुख मार्गदर्शक- डॉ. संजय पाटील, डॉ. संतोष येरावार उपस्थित होते.
डॉ. अशोक टिपरसे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले व आज समाजाला राष्ट्रीय सेवा योजनेची गरज आहे असे संबोधित केले डॉ. संतोष येरावार यांनी राष्ट्रीय सेवा योजना समाजात सामाजिक मूल्य जोपासण्यासाठी मदत करते आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश काशिदे प्रा. विनोद काळे डॉ. व्यंकट खंदकुरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्यंकट खंदकुरे यांनी केले व आभार प्रा. विनोद काळे यांनी केले.