आपत्तीग्रस्ताला पुन्हा उभं करण्यासाठी भरीव निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०४ : राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत, पुनर्बांधणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या तरतुदीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. यापैकी साडेअकरा हजार कोटींपैकी १५०० कोटी नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी, ३००० कोटी पुनर्बांधणीसाठी, ७००० कोटी आपत्ती सौम्यीकरण कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. राज्यातल्या प्रत्येक आपत्तीग्रस्ताला आर्थिक, नैतिक, सामाजिक आधार देऊन पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या निधीचे तत्परतेने वितरण केले जाईल. आवश्यकतेनुसार भविष्यात अधिक निधी उपलब्ध करण्याची शासनाची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *