महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू

 

हिंगोली प्रतिनिधी, दि. ०७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ हिंगोली  जिल्ह्याच्या ठिकाणी दि. ०८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत घेण्यात येणार आहे.

 

ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-अ, आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-ब, शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर हिंगोली, जिल्हा परिषद कन्या प्रशाला हिंगोली, ए.बी.एम.इंग्लीश स्कूल लिंबाळा हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली, संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय हिंगोली, पोदार इंटर नॅशनल इंग्लीश स्कूल अकोला रोड हिंगोली, कै.बाबूराव पाटील महाविद्यालय हिंगोली, अनुसया विद्यामंदीर खटकाळी बायपास हिंगोली, गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या १३ केंद्रावर २ हजार ९७६  परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

 

या परीक्षा केंद्र परिसरात दि. ०८ ऑक्टोबर, २०२२ रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

 

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या २०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

 

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४(२) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *