देगलूर प्रतिनिधी,दि.३१:- २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय केंद्रीय निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलुर महाविद्यालयात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २५ जानेवारी रोजी मतदार दिनाचे महत्व सांगणाऱ्या भित्ती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मतदानाची शपथ घेतली. तसेच २५ जानेवारीला सांस्कृतिक विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
त्यापैकी गुनानूक्रमे प्रथम- अजय दत्तात्रय इंदुरकर, द्वितीय- जयश्री अंकुश कोंडेवाड व तृतीय- सचिन सुजित कांबळे हे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आले. या चित्रकला परीक्षेत परीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक पाटील एम. व्ही. यांनी कार्य केले. दिनांक २७/०१/२०२३ रोजी पदवी व पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग आणि तहसिल कार्यालय निवडणुक विभाग देगलुर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटना या विषयावर बहुपर्यायी स्वरूपाची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेस महाविद्यालयातील अकरावी ते पदव्युत्तर वर्गातील एकुण १२० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
या परीक्षेत परीक्षक म्हणून प्रा. शिवानंद सुर्यवंशी, प्रा. मैलारे गणपत, प्रा. सौ. रेणुका लक्षटे, प्रा. मल्हारी सोनकांबळे यांनी कार्य केले. या परीक्षेस तहसिल कार्यालय देगलूर येथील अनिल दुगाने, संदिप कांबळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ व उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार यांनी भेट देवून पाहणी केली.. या सर्व स्पर्धा व परिक्षेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार व तहसिलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार श्री पंगे रामराव यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्यशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ. आर.बी.लक्षटे व डॉ. चोले माधव, प्रा. सौ. ए.एस.देबडवार, प्रा. शिवानंद सुर्यवंशी, प्रा. मल्हारी सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.