देगलूर प्रतिनिधी,दि.१७ :- परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने श्री गुरुजी जयंती व्याख्यानमाला राजशेखर मंगल कार्यालय या ठिकाणी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्रभाऊ आलुरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शितलताई अंतापूरकर या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून भरत उत्तमराव आमदापूरे हे होते.
प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सुरेन्द्रभाऊ आलुरकर यांचे स्वागत स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांतसेठ रेखावार यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्थानिक समन्वय समितीचे प्राथमिक विभागाचे शलेय समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचे स्वागत डॉ. सुरेन्द्रभाऊ आलुरकर यांनी शाल श्रीफळ देऊन केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुजी वंदना ने करण्यात आली. वैयक्तीक गीत वसंत वाघमारे यांनी सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांनी २५ वर्षांपासून अखंडपणे सुरू करण्यात आलेली ही व्याख्यानमाला आज २५ वे पुष्प गुंफत आहे. यापूर्वी अनेक वक्त्यानी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली होती.
आधीच्या काळात राजा करे सो कायदा अस्तित्वात होता. परंतु आधुनिक भारतात सार्वभौमत्व अस्तित्वात आले. सार्वभौम म्हणजे सगळ्यांच्या मतांचा विचार. ब्रिटन मध्ये लोकशाही आहे पण गणराज्य नाही. भारतात समाजवादी, धर्मनिरपेक्षता १९४९ च्या कायद्यात नव्हते नंतर १९५० निर्णयात ते आले. समाजवादी यांचा अर्थ कल्याणकारी राज्य व धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचा विचार न करता समाण वागणूक देणे.
मुलभूत स्वातंत्र्य-विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोपी नाही. यांच्या नावाखाली हिंसेला चिथावणी देऊ शकत नाही. आपणांस विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. कायदा, सुव्यवस्था यांच्या आधीन राहून काम करणे. स्वातंत्र्य, समता कायद्याने आनता येते पण बंधुता लादता येत नाही. तर तो निष्ठेचा विषय आहे. सर्वोच्च मुल्य बंधुता आहे. गाडा योग्य पध्दतीने चालण्याचे वंगन बंधुता आहे. धर्माचे सर्वोच्च स्थान बंधुता आहे. कायद्याला धर्माचे अधिष्ठान आहे. संविधानाच्या १७० व्या कलमात अस्पृश्यता नष्ट करणे हे आहे.
व्यक्तीला केंद्रस्थानी मानून संविधानाची निर्मिती केली आहे. समान नागरी कायदा अस्तित्वात येणे बाकी आहे. स्वातंत्र्य व समता याचा समतोल राखला गेला पाहिजे.
राज्यकर्ते कसेही वागले तर तुम्ही कोर्टाकडे दाद मागू शकता महिला व पुरुष यांना समान दर्जा दिला पाहिजे असे संविधानात म्हटले आहे तसेच पशुधनाचे संवर्धन झाले पाहिजे सर्व धर्मांसाठी समान कायदा असला पाहिजे.
असे प्रमुख वक्ते आपल्या भाषणातून म्हणाले. कार्यक्रमाचे समारोप डॉ. सुरेन्द्रभाऊ आलुरकर यांनी केले. आभार माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी केले तर सुत्रसंचलन माध्यमिक विद्यालयातील राधिका पांचाळ यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राथमिक मुख्याध्यापक दमन देगावकर व्याख्यानमाला प्रमुख भानुदास शेळके सह प्रमुख सुजित मुगटकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.