हैदराबाद प्रतिनिधी,दि.२९:- हैदराबाद येथील तेलंगाना मराठी मंच मंडळ यांच्या तर्फे श्रीमती शीतल नीमकर यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षापासून भावसार समाजात अग्रेसर होऊन डॉक्टर प्रशांत निमकर व त्यांची पत्नी शीतल निमकर हे समाजातील प्रत्येक कामासाठी पुढे होऊन काम करत असतात त्यामुळे त्यांनी भावसार समाजातील विविध संघटनाच्या वेगवेगळ्या पदाचे
अध्यक्ष पद देखील भूषवलेले आहे याच कामाची पावती देत पुन्हा एकदा भावसार समाजातर्फे २०२५ साठी भावसार व्हिजन इंडिया हैदराबाद (क्षेत्र १०४) श्रीमती शीतल नीमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने तेलंगणा येथील तेलंगाना मराठी मंच मंडळ यांच्यातर्फे डॉक्टर प्रशांत निमकर व त्यांच्या सुविध्य पत्नी शीतल निमकर यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
याप्रसंगी तेलंगाना मराठी मंच मंडळ चे प्रमुख पदाधिकारी श्री नितीन टीक्का,श्री संदेश भारद्वाज,गजानन बिडकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.