“स्थानिक दुकानदार देतात गणेशोत्सवासाठी देणगी – आपण मात्र खरेदी करतो ऑनलाइन!”
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या परिसरातील दुकानदार दरवर्षी उत्साहाने देणग्या देतात. ₹251 पासून ₹5001 पर्यंतची देणगी देत हे व्यापारी समाजाप्रती आपली
जबाबदारी पार पाडतात. मात्र, दुर्दैवाने सणासाठीची खरेदी मात्र अनेकजण Amazon, Flipkart, D-Mart सारख्या ऑनलाइन व मोठ्या मॉलमधून करतात.
यामुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होतो आणि गावातील व्यापाऱ्यांचा उत्साह कमी होतो. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक खरेदीला प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती
व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच, स्थानिक दुकानदारांनीही ग्राहकांना चांगल्या व परवडणाऱ्या दरात वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गावातील दुकानदारांकडूनच खरेदी करून एकत्र येऊन सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या अशा आशयाचे मेसेज सुद्धा सोशल मीडियावर ट्रेन करत आहेत.