देगलूर येथे श्री बालाजी झेंड्याची आगमन पूजा.

देगलूर दि.१७ :- येथील धार्मिक परंपरेने दरवर्षी स्थापित करण्यात येणारा श्री बालाजी झेंडा यंदाही वंशपरंपरेप्रमाणे श्रावण कृष्ण दशमी सोमवार दि १८|८ २०२५ रोजी देशपांडे गल्लीत स्थापन करून पूजा करण्यात येणार आहे.

 

 

दरम्यान हा झेंडा मानाचे यजमान असणाऱ्याकडे पूजेसाठी नेण्यात येतो. तसेच श्री झेंड्याची दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक काढण्यात येऊन झेंडा दि. २७ऑगस्ट बुधवार गणेश चतुर्थी व दि. २८ ऋषीपंचमीला लाईन गल्ली भागातील ओट्यावर या झेंड्याची स्थापना करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

 

 

तसेच शेवटी दि ८।९।२०२५ रोजी सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९सप्टेंबर रोजी लाईन गल्ली मुख्य ओट्यापासून भव्य मिरवणूक काढून मदनूर नाका [तेलंगाणा]पर्यंत पदयात्रेद्वारे झेंड्यास भावभक्तीने पुढे मार्गस्थ करण्यात येणार असल्याची माहिती श्री बालाजी झेंडा समिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.