नायगाव प्रतिनिधी,दि.१८ :- नांदेड जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नायगाव तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतीमाल व पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत व्हावेत या मागणीसाठी नायगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, पत्रकार बाळासाहेब पांडे, गुलाब पाटील सोमठाणकर, प्रदीप पाटील, शिवाजी पाटील, सुरेश पाटील, श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
“अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य ते नुकसानभरपाई द्यावी,” अशी ठाम भूमिका मान्यवरांनी मांडली.
नायब तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन देताना शेतकऱ्यांच्या समस्या अधोरेखित करण्यात आल्या. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना शिवराज पाटील होटाळकर व मान्यवर उपस्थित होते