मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी.

  नाशिक, दि.०९:- राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली.…

नांदेड प्रतिनिधी दि.०९ :- देगलूर तालुक्यात आज एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत देगलूर शहरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

 

कंधार येथील आमदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या भव्य कार्यक्रमात देगलूरचे माजी नगरसेवक दिगंबर कडलवार, भाजप शहर उपाध्यक्ष बालाजी मैलागीरे, उ.बा.ठा. शिवसेना शहरप्रमुख रवी उल्लेवार, सुभाष अक्यमवार, नागनाथ आपस्लवार, सुधाकर उल्लेवार, श्रीनिवास उल्लेवार, राजू पांडलवार, शैलेश पांडलवार, गंगाधर कडलवार, सचिन कडलवार, किरण कडलवार, रितेश यरगलवार, लक्ष्मण आरगुलवार, बालन्ना मैलागीरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

 

या पक्षप्रवेशामुळे देगलूर तालुक्यातील विरोधी पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. दीर्घकाळापासून विविध पक्षात कार्यरत असलेल्या या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने देगलूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

या वेळी गंगाधर बत्तुलवार, दिगंबर कौरवार, बब्बलू टेकाळे, ओंकार उल्लेवार, पिटू सुरकुटलावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

आ. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर आणि परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने बळकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या नव्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा अधिक भक्कमपणे फडकताना दिसेल, असा विश्वास पक्षकार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

    नाशिक, दि. ७: आगामी सिंहस्थ कुंभमेळयात पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्यने…

मलकापूर येथे राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

  मलकापूर दि.०६:- डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ कार्यक्रम मलकापूर…

नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब! गोदावरी गंगापूजन सोहळ्याची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये

  नांदेड प्रतिनिधी दि.०४:- गत २४ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या भव्य गोदावरी गंगापूजन सोहळ्याची नोंद यंदा…

“माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पुढाकारातून बतकम्मा स्पर्धा व कर्मचाऱ्यांचा सत्कारसोहळ्याची तयारी उत्साहात”

“माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पुढाकारातून बतकम्मा स्पर्धा व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळ्याची तयारी उत्साहात” देगलूर प्रतिनिधी,दि.०२:-…

देगलूरमध्ये शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याची मागणी.

  देगलूर प्रतिनिधी दि.०१:-देगलूर शहरात शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याची मागणी स्थानिक समाजसेवक दिगंबर रमेशराव कौरवार यांनी…

धनाजी जोशी यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश जयश्री ताई बाळु काब्दे यांच्या हस्ते प्रवेश.

  धनाजी जोशी यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश जयश्री ताई बाळु काब्दे यांच्या हस्ते प्रवेश. देगलूर…

  भाजपच्या आढावा बैठकीसाठी इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन! देगलूर (प्रतिनिधी)दि.२६:- देगलूर विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजपा…

शेतकरीपुत्र खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.

शेतकरीपुत्र खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.   सम्राट बळीराजाची प्रतिमा…