नवी दिल्ली प्रतिनिधी, दि. ०८ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. शेखर मांडे हे रविवार,८ऑगस्ट २०२१ रोजी ‘महाराष्ट्राचे विज्ञान क्षेत्रातील योगदान’या विषयावर ५२ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत ८ऑगस्ट रोजी डॉ. मांडे हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.
डॉ. शेखर मांडे यांच्या विषयी
डॉ. शेखर मांडे हे देशातील राष्ट्रीय प्रयोगशाळांची शिखर संस्था असणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयर)महासंचालक म्
नागपूर विद्यापीठातून एमएस्सी आणि बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पीएचडी केल्यानंतर डॉ. मांडे यांनी नेदरलँड आणि अमेरिका येथील विद्यापीठात संशोधन केले. परदेशातील चार वर्षांनंतर ते चंडीगड येथील इंस्टिटयूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजीत शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाले. तेथून हैद्राबाद मधील डीएनए फिंगरप्रीटींग संस्थे मार्गे ते पुण्यात एनसीसीएस मध्ये आले.
पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राच्या( एनसीसीएस) संचा
देशातील विज्ञान जगतात महत्वाचा मानला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. ‘इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’ आणि ‘नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ या महत्त्वाच्या विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्य आहेत. त्यांनी ६०पेक्षा अधिक संशोधन निबंध लिहिले आहेत.
रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवार, ८ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/