सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. ०९ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे. भालाफेकीसाठी नीरजच्या मन आणि मनगटात विश्वासाची, समर्थ साथ यांची ताकद भारणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसह, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रा याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *