हैदराबाद प्रतिनिधी दि.११ : श्री पांडुरंग स्वामी मंदिर समिती, व संत ज्ञानेश्वर महाराज भजन मंडळ इंदिरानगर श्री सत्यनारायण स्वामी मंदिराजवळ चिन्रा चेरवू रामंतापुर हैदराबाद. यांच्यातर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षीही अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
मंदिर समिती अध्यक्ष, श्री सुभाष पाटील व समिती यांच्याकडून सर्व मराठी बांधवांना, व हरि भक्तांना, व श्रोत्यांना. आवाहन करण्यात येते की, सप्ताह दिनांक २९ -८ -२०२१ रोजी सुरू होऊन त्याची सांगता दिनांक ५ -९ – २०२१ रोजी होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ४:०० ते ५:०० काकड आरती, सकाळी ७:००ते ११:३० पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण, दुपारी १२:००ते १:०० श्री संत तुकाराम गाथा भजन,दुपारी १:०० ते २:०० प्रसाद, संध्याकाळी ४:०० ते ५:३० प्रवचन, संध्याकाळी ६:०० ते ७:०० हरिपाठ, रात्री ९:०० ते १२:०० हरिकीर्तन, आणि रात्री १२:०० ते सकाळी ४:०० वाजेपर्यंत हरिजागर असणार आहे.
कीर्तनकार ,भजन मंडळ , व प्रसाद दाते.
- रविवार दि: २९ -०८-२०२१ ह.भ.प.श्री अशोक महाराज रामअंतापुर , श्री पांडुरंग भजन मंडळ रंगारेड्डी , पंगत श्री सतीश पाटील.
- सोमवार दि: ३०-०८-२०२१ ह.भ.प. श्री गिरिधर पाटील तेलगाव, श्री सच्चितानंद भजन मंडळ जियागुडा, पंगत श्री सुरेश नुदनुरे.
- मंगळवार दि: ३१-०८-२०२१ ह.भ.प. श्री नरसिंग महाराज केरूरकर, श्री जयभवानी भजन मंडळ उप्पल, पंगत श्री लहू मारोतीराव जवळदापके.
- बुधवार दि: ०१-०९-२०२१ ह.भ.प. श्री भगवत महाराज हंडे पंढरपूरकर, श्री संत एकनाथ भजन मंडळ गंगाबावडी, पंगत श्री भागवत नरसिंगराव जवळदापके.
- गुरुवार दि:०२-०९-२०२१ ह.भ.प. श्री विश्वनाथ महाराज मोरे, श्री जय भवानी भजन मंडळ उप्पल, पंगत श्री रामस्वरूप भाटी.
- शुक्रवार दि:०३-०९-२०२१ ह.भ.प. श्री बाबामहाराज काडगावकर, श्री संत तुकाराम भजन मंडळ इसामिया बाजार, पंगत श्री प्रदीप बिरादार.
- शनिवार दि:०४-०९-२०२१ ह.भ.प. श्री महादेव महाराज सलगरकर, श्री पांडुरंग भजन मंडळ चंदनवाडी, पंगत श्री सीताराम चिट्टे निरमनाळी.
नित्य हरिपाठ श्री सोनेराव कवडे, श्री बंकटराव रोडे, श्री वैजनाथ राव कदम, श्री कांतीलाल महाराज, श्री अशोक महाराज, श्री बाबुराव पांचल, श्रीकांतराव शिवणे, श्री व्यंकटराव गुरनाळे, श्री लक्ष्मण पांचाळ. हे असणार आहेत. या शिवाय गायक श्री बाबुराव पांचाळ, श्री शेकापुरकर महाराज, मृदंग वादक श्री रामभाऊ महाराज, शिवा स्वामी. पेटीवादक श्री भरत पांचाळ, श्री नारायण अष्टेकर. विणेकरी श्री सोनेराव कवडे, श्री अशोक महाराज बोरफळे, व व मंदिरातील पुजारी श्री मृत्युंजय पांडे, श्री कांतीलाल महाराज. आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून एम.एल.ए. श्री सुभाष रेड्डी उप्पल विधानसभा क्षेत्र व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती बंडारू श्री वाणी व्यंकटराव नगरसेवक रामंतापुर हैद्राबाद हे लाभले आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा जागृक समितीचे अध्यक्ष श्री सुभाष पाटील, उपाध्यक्ष श्री एकनाथ बिरादार, श्री सतीश बिरादार, श्री सतीश रोडे. सचिव श्री बंकटराव रोडे, जॉइंट सेक्रेटरी श्री निलकंठ बिरादार. कोषाध्यक्ष श्री पांडुरंग राव तलवाडकर, श्री पांडुरंग बिरादार, उप कोषाध्यक्ष श्री कृष्णा पाटील, कार्यक्रमाचे सचिव श्री शिवाजी लाखणगावे, श्री निवास बिरादार, कमिटी मेंबर, व मार्गदर्शक श्री अशोक मोघे, श्री वैजनाथ कदम, श्री सर्वोत्तम जोशी, सिताराम चिट्टे, श्री पांडुरंग नवघरे, श्री रामराव तळवाडकर, श्री मगरध्वज शिंदे, श्री विनायक नाईक, श्री रंगनाथ जाधव, श्री सम्रत केदमपुरे, श्री अर्जुनराव गोजेगावे, श्री सुनील माकणे, श्री शहाजी हुलसुरे, श्री तानाजी बिरादार, श्री सतीश सेंळके, सदस्य श्री श्रीकांत रोडे, श्री ईटीकला सतीश, श्री बाकी मल्लेश, श्री पूतासाई किरन, श्री वेंबती श्रीनिवास, श्री संतोष बिरादार, श्री व्यंकटराव कवाळे, श्री संतोष कुलकर्णी, श्री सुरज बारीदरी, श्री अजय हनसाठे, श्री शिवाजी बिरादार, श्री नवनाथ बिरादार, श्री सुरेश कणसनाळे, श्री गणेश धुमाळ, श्री बालाजी शामराव, श्री वैजनाथराव आमदाबादे, श्री सावनपल्ली जाधव, श्री सुधाकर देशमुख, व श्री भाऊराव बारीदरी हे आहेत.