तेलंगणा मराठा मंडळाला दिला ५० हजाराचा धनादेश!
हैदराबाद प्रतिनिधी, दि.२२:- मित्रागंण ढोल ताशा पथक हे १५ ऑगस्ट २०१५ रोजी स्थापन केलेलं हैदराबादचे पहिलं पथक आहे, सुरवातीला ४ फायबर च्या ढोल पासून सुरू केलेला प्रवास आज वर्षानंतर जवळपास ३५ चामडीच्या ढोल पर्यत पोहोचलाय.
ह्यात स्त्री,पुरुष मुलं, व मुली उत्साहाने प्रशिक्षण घेऊन २०० हून अधिक सांस्कृतिक समारंभाची शोभा आजतागायत वाढवली आहे. हैदराबाद मधल्या सर्व मानाच्या मिरवणुका, व सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये वादन करण्याचा लाभ या पथकाला लाभला.
जे कोणी सदस्य ज्याना पथक मध्ये सामील होऊन प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी facebook वर मित्रागंण ढोल ताशा पथक hyderabad ह्या page वर जाऊन माहिती मिळवू शकता असे आवाहन अंबरीश लहानकर यांनी केले आहे.
मित्रांगण ढोल ताशा पथक हैदराबाद हे गेले ७ वर्ष हैदराबाद मध्ये राहणारे मराठी व अमराठी लोकांना मराठी पारंपरिक ढोल तमाशाचे प्रशिक्षण देत आहे. नुकत्याच झालेल्या तेलंगणा मराठा मंडळ तर्फे दसरा दिवाळी संमेलनात मित्रांकडून ढोल ताशा पथक ह्याचे संस्थापक अंबरीश लहानकर मुख्य प्रशिक्षक सुमित खटावकर, ढोल प्रशिक्षक तुषार झाडे, प्रशासक प्रमुख सोनिया कामत, व आनंद बिदरकर. यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज
सांस्कृतिक ट्रस्ट तेलंगणा मराठा मंडळ ह्याना ५०००० रुपये देणगी स्वरुपात देण्यात आली व मराठा मंडळाचा पुढचा वाटचाली साठी मराठा मंडळाचे प्रमुख प्रकाश पाटील, लक्ष्मीकांत शिंदे, मदन जाधव व दिलीप जगताप साहेबांना दसरा दिवाळी संमेलन करिता शुभेछा दिल्या.
त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हल्ली स्वतःची संस्था मंडळ किंवा एखादे ग्रुप असल्यास स्वतःलाच मानधनाची कमी असते पण त्यातच मनाचा मोठेपणा दाखवून अमरीश लहानकर व मित्रागंण ढोल ताशा पथक ग्रुप यांच्यातर्फे पन्नास हजार रुपयांचा धनादेश इतर संस्थाला देऊन त्यांनी मनाचा मोठा मोठेपणा दाखवला आहे व एक आदर्श दाखवून दिला आहे.