प्रलंबीत कामाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत चक्क मुख्य अभियंत्याच्या दारात

 

नांदेड प्रतिनिधी,दि.२२:-  नांदेड जिल्ह्यातील सदैव सामाजिक प्रश्नांसाठी विविध समस्यांचा विरोधात रणांगणात असणारी पेठवडज ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी नारायण गायकवाड यांनी ग्रामपंचायत तसेच परिसरातील भागातील रस्त्याची दुरावस्था चव्हाट्यावर आणून

कुरुळा,गऊळ,अंबुलगा,कळका,मंगनाळी,पेठवडज,गोणार,येलूर, मसलगा या राज्य महामार्गावरील १६१ ए तसेच सोनखेड,बारुळ,पेठवडज,पांडूर्णी,मुखेड या राज्य महामार्ग २५५ ता. या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यात यावी.

 

 

यासाठी ग्रामस्थासह सरपंच प्रतिनिधी नारायण गायकवाड,रहाटीचे सरपंच निळकंठ कौसल्ये,शिरशीचे सरपंच नागेश कैलासे,गोणारचे सरपंच हरी पा.पवळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह दि.२१ नोव्हेंबर पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अंभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

तद्नंतर दोन तासानंतर लेखी आश्वासन देताच उपोषण स्थगित करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *