जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुजळगा येथील शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

देगलूर प्रतिनिधी,दि.१०:- देगलूर तालुक्यातील मुजळगा येथील चांदू मारोती कांबळे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.

 

चांदु मारोती कांबळे यांची प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजळगा येथे तिसरी पर्यंत झाले. त्यानंतर चौथी ते सहावी चैनपुर येथे झाले. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण, आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय उदगीर येथे झाले.

 

 

 

 

महाविद्यालय शिक्षण देगलूर महाविद्यालय देगलूर येथे झाले त्यानंतर त्यांनी अध्ययन अध्यापन पदविका उत्तीर्ण केली.२०११ मध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस खात्यात भरती झाले .त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण करून घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा कडे वळले.

 

 

 

 

 

२०१७ मध्ये खात्यांतर्गत पीएसआय च्या परीक्षेमध्ये फायनल मेरिट लिस्ट मध्ये थोड्याशा मार्कमुळे पीएसआय होण्याचे स्वप्न राहिले. तरीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करून २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिषदेमध्ये त्यांची १५२ रँक ने निवड झाली.

 

 

 

 

 

 

या यशाचे श्रेय त्यांची आई. मैनाबाई मारोती कांबळे, वडील मारोती माधवराव कांबळे, पत्नी बेबीताई तसेच दोन भाऊ, बहीण यांना यशाचे श्रेय जाते. घरात जेमतेम दोन एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब

 

 

 

 

 

आंबेडकर यांचे विचार आपल्या आचरणात अंगीकारून आपण देखील पोलीस प्रशासनात यावं असं चांदू मारोती कांबळे यांना वाटलं आणि असे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे यश मिळवलं. या यशाबद्दल मुजळगा व देगलूर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *