माहिती विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप

नवी दिल्लीदि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी  होणार आहे .

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत एकूण ६० व्याख्यान पूर्ण होत असून १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता  डॉ. दिलीप पांढरपट्टे हे व्याख्यानमालेचे समारोपीय भाषण करणार आहेत.

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर नामवंत मान्यवरांचे व्याख्यान झाली आहेत. व्याख्यानमालेच्या पूर्वाधात ४४ आणि उत्तरार्धात १४ असे एकूण ५८ व्याख्यान पूर्ण झाले असून उद्या या व्याख्यानमालेचे ५९ वे व ६०वे  पुष्प गुंफण्यात येणार आहे.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याविषयी…

डॉ. दिलीप पांढरपट्टे हे प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. त्यांनी एलएलएम, एमबीए या पदव्यांसह पीएचडी प्राप्‍त केली आहे. सनदी अधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,उपायुक्त आणि उपसचिव पदावर त्यांनी काम पाहिले आहे.

प्रशासकीय सेवा बजावताना डॉ. पांढरपट्टे यांनी आपली वाड़मयीन व साहित्यिक सर्जनशीलता फुलवित ठेवली आहे. ‘घर वाऱ्याचे, पाय पाऱ्याचे’ हा ललित लेखसंग्रह, ‘कथा नसलेल्या कथा’ हा कथासंग्रह, ‘बच्चा लोग ताली बजाव’ हा विनोदी लेखसंग्रह ,उर्दू शायर आणि शायरीचा परिचय देणारे ‘शायरी नुसतीच नाही’ , ‘शब्द झाले सप्तरंगी’ हा मराठी गजल संग्रह , ‘सव्वाशे बोधकथा’ हा बोधकथा संग्रह, ‘डॉ. राम पंडित संपादित मराठी गजल’ तसेच कूळकायद्यातील घरठाण हक्काबाबत माहिती देणारे ‘राहील त्याचे घर’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

डॉ.पांढरपट्टे हे २२ जानेवारी २०२० पासून  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

रविवारी समाज माध्यमांद्वारे व्याख्यानाचे प्रसारण  

          रविवार,  १५ ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *