हैदराबाद प्रतिनिधी, दि.२४. प्रतिवर्षीप्रमाणे हैद्राबाद येथील मराठा भगिनी मंडळ यांच्यातर्फे राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता, मा जिजाऊ जयंती उत्सव व संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने तेलंगणा मराठा भगनी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२-०१-२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी बस डेपोजवळ साजरा करण्यात आला.
यावेळी तेलंगाना मराठा भगिनी मंडळाचे अध्यक्ष अरुणा शिंदे तसेच भगिनी मंडळ व इतर भगिनी मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते. हा सांस्कृतिक कार्यक्रम व विजेत्यांना बक्षिसे व महिलांना भेटवस्तू देऊन करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.