देगलूर प्रतिनिधी,दि.२४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय, देगलूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे रामपूर, ता.देगलूर येथे १७ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष युवक शिबीराचे उदघाटन प्रसिद्ध सर्जन डॉ. विनायक मुंडे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. विलास तोटावार तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. देवेंद्र मोतेवार, प्रा.मनूरकर एस.बी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद काळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. व्यंकट खंदकुरे यांनी केले तर आभार डॉ. संतोष येरावार यांनी मानले.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास” या थीम खाली अनेक लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात आले. १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सत्रात तालुका कृषी अधिकारी मा.सोमेश्वर गिरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
१९ जानेवारी २०२३ रोजी सकाळच्या सत्रात पशु आरोग्य शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी, डॉ.व्यंकट जाधव, डॉ. देशमुख जी.व्ही. उपस्थित होते. त्यांनी गावातील बैल, गाय, म्हैस, शेळी या पशूंची आरोग्य तपासणी केली.
दि.१९ जानेवारी रोजी दुपारच्या बौद्धिक सत्रात डॉ. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या बौद्धिक सत्रामध्ये प्रा.डॉ.सर्जेराव रणखांब यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. अशोक टिपरसे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व त्याचे परिणाम, याविषयी मार्गदर्शन केले. संध्याकाळच्या सत्रात प्रा. माधव बावगे सराचे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान झाले . २० जानेवारी रोजी संध्याकाळच्या सत्रात प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज बारूळकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन झाले.
श्रमदानातून रामपूर ते देगलूर या रस्त्यावरील नाल्यात मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली. नाल्या जवळील खड्डे श्रमदान करून बूजवीण्यात आले.
दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारच्या बौद्धिक सत्रात प्रमुख मार्गदर्शक डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी बाल विवाह एक समस्या, या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संध्याकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. सुनील जाधव व रुग्ण सेवा मंडळाचे कर्मचारी राजू शिंदे यांनी गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी १०३ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
२२ जानेवारी रोजी गावात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार डॉ.सर्जेराव रणखांब डॉ.नीरज उपलंचवार ,सरपंच प्रतिनिधी राम पांडवे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश काशिदे, प्रा. विनोद काळे, डॉ. व्यंकट खंदकुरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले.
दररोज सकाळच्या सत्रात योग प्रशिक्षक प्रा. सिताराम हाके यांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे दिले.
23 जानेवारी रोजी सात दिवशीय विशेष युवक शिबिराचा समारोप समारंभ झाला या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सहसचिव सूर्यकांत नारलावार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अशोक टिपरसे होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी अध्यक्षीय समारोप केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद काळे ,प्रास्ताविक डॉ.व्यंकट खंदकुरे, तर आभार डॉ.संतोष येरावार यांनी मानले या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ .अनिल चिद्रावार, उपप्राचार्य चमकुडे एम एम , महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापिका आणि गावातील ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश काशिदे, डॉ.व्यंकट खंदकुरे, प्रा. विनोद काळे, सरपंच प्रतिनिधी राम पांडवे, गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी स्वयंसेवक आदींनी सक्रिय सहभाग घेतला. या सात दिवसीय शिबिरामुळे गावात अनेक समाज उपयोगी कामे झाल्यामुळे ग्रामस्थांनी सर्व कार्यक्रम अधिकारी, प्राचार्य, विद्यार्थी आणि संस्थेचे आभार मानले.