देगलूर प्रतिनिधी,दि.२७ :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यावतीने आयोजित आजादी की मशाल यात्रेचे देगलूर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवाजी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी महापुरुष व क्रांतीकारकाच्या स्वरूपात मशाल रैलीत सहभागी झाल्यामूळे रैलीचे आकर्षण व शोभा वाढली.
विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी यांची मानवी साखळी तयार करून रॅलीचे स्वागत केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी मशाल प्रज्वलित केली, याप्रसंगी अ. व्या. शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार कार्यकारिणी सदस्य देवेंद्र मोतेवार , रवींद्र अप्पा द्याडे व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांच्यासह मशाल यात्रा महाविद्यालयामध्ये प्रवेश करीत असते वेळी मोठ्या उत्साहात भारत माता की जय, वंदे मातरम व स्वातंत्र्यवीरांच्या जयघोष करत कार्यक्रमास्थळी आगमन झाले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन ख़ताळ यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी मशाल रैलीचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. बालाजी कतूरवार ,सदस्य डॉ. अभिमन्यू पाटील , डॉ. मनुरकर सर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. मनुरकर यांनी प्रास्ताविकात मशाल यात्रेच्या ऊदेशाची माहिती दिली. आजादी की मशाल यात्रे निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य वीरांची यशोगाथा असलेल्या पोस्टरचे प्रदर्शनी भरविण्यात आले होते . जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले.
नाविन्यपूर्ण मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख डॉ नीरज ऊपलंचवार , समिती समन्वयक डॉ किशन सुनेवार , ऊपप्राचार्य डॉ ए बी चिद्रावार ऊपप्राचार्य एम एम पटेल पर्यवेक्षक प्रा संग्राम पाटील यांच्यासह एन सी सी स्वयंसेवक, स्वयंसेविका व विद्यार्थी ऊपस्थित होते. रैली यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ रत्नाकर लक्षटे यांनी केले व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.