देगलूर येथील महाजन सरांच्या चेतना इंग्लिश स्कूल मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

देगलूर प्रतिनिधी,दि. ०२:-  देगलूर येथील महाजन सरांच्या चेतना इंग्लिश स्कूल मध्ये २६ जानेवारीला व २८ जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळे तर्फे घेण्यात आले. त्यामध्ये २६ जानेवारी ला सकाळी सुमारे ८ वाजता शाळेचे संस्थापक मा. श्री मयुर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आणि त्यानंतर शाळेतल्या काही मुलांनी अगदी चांगल्या प्रकारे नृत्य करून त्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. शाळेमध्ये काही विविध प्रकारचे गेम्स घेण्यात आले होते आणि त्या गेम्स चे पहिला, दुसरा आणि तिसरा असे तीन विजेते निवडण्यात आले होते.
प्रथम विजेत्याला गोल्ड, द्वितीय विजेत्याला सिल्व्हर,  आणि तृतीय विजेत्याला ब्रॉन्झ चे मेडल बक्षीस म्हणून शाळेच्या वतीने दिले गेले. आणि हे बक्षीस सौ. महाजन मॅडम आणि श्री मयुर महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमांचे व्यवस्थित रित्या सुत्र- संचालन सौ. रोहिणी मजा महाजन यांनी केले या कार्यक्रमा वेळेस शाळेचे सर्व टिचर्स उपस्थित होते.
तर दूसरा कार्यक्रम २८जानेवारी रोज शनिवार या दिवशी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्ध्यार्थीच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना स्टेजवर जाण्यांचे धाडस यावं हे या कार्यक्रमा मागचा हेतु होता.
या कार्यक्रमांत विविध गाण्यांवर ४ शाळेतल्या मुलांनी नृत्य प्रदर्शन केले काही ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ सुद्धाआयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या वेळेस शाळेतील शिक्षकांचे केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.
टिचर्सना सुद्धा बेस्ट टिचर अवार्ड देण्यात आले त्यांमध्ये कु. रेशमा देगलुरकर,सौ.  पूजा महाजन, कु अश्विनी गॅडपवार आणि श्री बालाजी मुत्यपवार यांचा समावेश होता. आणि हे अवार्ड शाळेचे संस्थापक श्री मयुर महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमावेळेस शाळेचे सर्व स्टाफ आणि शाळेचे सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. रोहिणी महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *