देगलूर – भारतीय स्वातंत्र्याला ७५वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने देशभरात या कालावधीत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून स्वातंत्र्य चळवळीला उजाळा देण्यासाठी स्वातंत्र्य चळवळी वर आधारीत असलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन समर्थ वाचनालयाच्या वाचन कक्षात आयोजीत केले होते या प्रदर्शनाचे उदघाटन. प्रसिध्द भुलतज्ञ ग्रंथ प्रेमी डाॅ आशुतोष सदावर्ते यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी उपप्राचार्य गंगाधर हिंगोले , डाॅ कत्तुरवार यांनी मार्गदर्शन केले. का.सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच महेश कुडलीकर लिखीत “प्रवचन योगी वै.धुंडामहाराज देगलूरकर ” चरिञ पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष नरहरी सावकार पोलावार, उपाध्यक्ष सुर्य॔कांत नारलावार,सचिव अविनाश देशपांडे हसनाळकर कोषाध्यक्ष देवेंद्र शेठ मोतेवार ,का.सदस्य रमेश कंतेवार,प्रा.महेश कुडलीकर प्रा.कत्तुरवार, प्रा.कोठेकर ,सत्यनारायण तोष्णीवाल, प्रा.मानधना गादेवार,ग्रंथपाल पी बी कदम , जयराम गुरूपवार, विठ्ठल पुठ्ठेवाड कर्मचारी, वाचक, उपस्थित होते.