पुणे प्रतिनिधी, दि.१८ :- डॉक्टर दादासाहेब गुजर प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे व वार्षिक क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विविध खेळ सांस्कृतिक कला व कौशल्य दाखवत विविध कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
यात कुमारी हर्षदा माधव शेपुरे हिला लिंबू चमचा मध्ये प्रथम क्रमांक व पोते शर्यत मध्ये तिसरा क्रमांक तर धावण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. यासह अनेक विद्यार्थ्यांनी देखील पारितोषके मिळवली आहेत मुलांच्या या अशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.