देगलूर प्रतिनिधी, दि. २५:- देगलूर येथील श्री चैतन्य सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत चेतना इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला गेला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मंदाकिनी महाजन या होत्या. संस्थेचे सचिव श्री मयूर मधुकरराव महाजन यांनी मुलांना शिवाजी महाराजांची गोष्टी रूपाने माहिती दिली. सौ रोहिणी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोवाडा व रायरेश्वरा वरील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा यावर सुंदर अभिनय सादर केला, स्वरा ढगेनी शाहीरच्या भूमिकेचे सुंदर पद्धतीने प्रकटीकरण केले, अनय मेहरकर व शांभवी पाटील ने शिवाजी महाराजांची भुमिका अगदी हुबेहूब केली.साईसमर्थ काळे याने अफजल खान याची भूमिका केली, वेदश्री गायकवाड हिने जिजामातेची सुंदर भूमिका केली.
मैत्रेयी महाजन हिने बडी बेगम अली आदिलशहाची आई ची भूमिका बजावली. पद्मनाभ, अमित गुंडावर, शिवकुमार पाटील, हर्ष महाजन व भार्गवी भांगे यांनी मावळ्याची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने केली. आराध्य पदमवार याने जीवा महाला व प्रतीक मसुरेवार याने सय्यद बंडाची भूमिका केली.
सगळ्या छोट्या मावळ्यांनी आनंदाने त्यात सहभाग घेतला, हे सर्व करताना त्यांच्यातला जो आत्मविश्वास होता तो पाहण्याजोगा होता आणि हो आमच्या मुलांनी पोवाडा, महाराजांची स्तुती, शिवगर्जना खणखणीत आवाजात सादर केली. असाच उत्साह शिक्षकांमध्येही पाहण्यात आला, त्यांनी मुलांकडून जी तयारी करून घेतली ती खरंच कौतुकास्पद होती. सौ पूजा महाजन व कु. रेश्मा देगलूरकर यांनी मुलांकडून चांगल्या प्रकारे तयारी करून. घेतली असल्यामुळे त्यांचे शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.
श्री बालाजी मुत्तेपवार, कु. अश्विनी गड्डपवार, कु. स्वाती कुडदे, कु. ईशा शिंदे व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास करिता परिश्रम घेतले.
चेतना इंग्लिश स्कूल नेहमीच सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम करत असते आणि पुढेही करत राहणार .आत्ताच्या पिढीला आपले महाराज माहीत असणे फार गरजेचे आहे व हे पोहोचवण्याचे काम चेतना इंग्लिश स्कूल करत आहे .