मानव विकास योजनेअंतर्गत एकूण ४८ सायकल वाटप
देगलूर प्रतिनिधी,दि.२६ :- शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत ४८ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.तसेच ICT लॅब चे उद्घाटन करण्यात आले.
या शाळेत शहरातील वेगवेगळ्या भागांतून मुली शिक्षण घेत आहेत. मुलींच्या प्रगतीसाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही सावित्रीबाई फुले शाळा ही नेहमी धडपडत असते , म्हणून आजूबाजूच्या परिसरातील पालक आपल्या मुलींना या शाळेत शिकवण्यासाठी उत्साहित असतात.
शाळेतील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एकूण ४८ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलींच्या चेहऱ्यावर सायकल मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मुलींना शाळेला ये-जा करण्यासाठी अडचण होत असे , या सायकलीमुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक चांगली भेट शासनाकडून मिळाली असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकहीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रा न कहाळेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पंजाबराव सूर्यवंशी, अँड जे आर गजभारे सचिव लोकहीत शिक्षण संस्था,तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.वाय.आर.गजभारे, श्री. देवानंद कंधारकर (सदस्य,लोकहित शिक्षण संस्था देगलूर), प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.के.सी.पाटील,मानव विकास विभाग प्रमुख एच बी बिल्लाळीकर, तंत्रस्नेही शिक्षक श्री मुजावार एस के,वर्गशिक्षक कपाळे एम डी,देवक्तते पी एच, संबंधित विद्यार्थी व पालक तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.