सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानतर्फे श्री क्षेत्र जगन्नाथपुरी येथे भागवत कथा उत्साहात संपन्न .

 

 

मुखेड़ प्रतिनिधी, दि.२४ :- मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील श्री सदगुरू नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे दिव्य स्वरूपात भागवत कथा सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. भागवत कथा सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.


श्री प.पु सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड च्या वतीने आयोजित श्री क्षेत्र श्री जगन्नाथपुरी ( चारधाम पैकी एक धाम ) येथे श्री श्रीमद् भागवत कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात संपन्न झाली आहे. महाराष्ट्रातून व आंध्र प्रदेशातून भाविक कथेचे श्रवण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 

 

 

 

 

श्री जगन्नाथ पुरी येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रुद्र , लक्ष तुलसी अर्चना, सामूहिक जप, काकडा, हरिपाठ , ग्रंथतुला, शर्करा तुला, विष्णुसहस्रनाम पाठ, अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात दि. ९ एप्रिल २०२३ ते दि.१५ एप्रिल २०२३ दरम्यान संपन्न झाले.

 

 

 

 

 

अनेक भक्तगणांची उपस्थिती आमदार श्री राजेश पवार नायगाव विधानसभा , मा.आमदार सुभाषराव साबणे मा . विधानसभा ,सौ पूनमताई राजेश पवार मा. .जि. प. सदस्य , विजय चव्हाण उपनगराध्यक्ष नगरपरिषद नायगाव, प्रकाश पाटील बेमरेकर मा.जि. प.सदस्य नांदेड,डॉ. सुधाकर कोटगिरे ,डॉ‌.मानसी पवार मुंबई ,डॉ. संतोष बोधनकर , हेमंत बेंडे , भार्गव राजे , विशाल चौधरी आदि कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 

 

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील भक्तांचे सहकार्य श्री बाळू महाराज जोशी येवतीकर, राजू पाटील मोकासदरेकर, दत्तात्रय पाटील टाकळीकर, महेश धूमशेठवार , नंदकुमार दाचावार बारहळी, पांडुरंग पाटील टाकळीकर, संतोष महेंद्रकर , संतोष मेडेवार , व्यंकट सावकार पदमावार , चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर,अवधूत बेंडे नांदेड, लक्ष्मीकांत कुलकर्णी थडीबोरगावकर यांनी श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी येथे विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.

 

 

 

 

सिकंदराबाद येथे सर्व भक्तगणासाठी जातानाची जेवणाची व्यवस्था श्री देवदास जळबा पाटील येवतीकर यांच्यावतीने करण्यात आली होती .हैदराबाद येथे येतानाची व्यवस्था श्री महेंद्रकर परिवार मुखेड व डॉ.शिवदास ढगे हैदराबाद यांच्यावतीने करण्यात आली होती. यात्रेमध्ये सुमारे चारशे भाविक उपस्थित होते.
गावकऱ्यांनी भव्य अशी गुरुवर्य नराशाम महाराज यांची शोभा मिरवणूक काढलीव येवती येथील भाविकांनी भव्य अशी शोभा मिरवणूक काढून गुरुवर्य यांचे येवती येथे स्वागत केले आहे.

 

 

 

 

पुढील वर्षी द्वारका येथे भागवत कथा मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथील श्री सद्गुरु नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने पुढील वर्षी द्वारका येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. द्वारका येथे आयोजित भागवत कथेस नागरिकांनी व भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सद्गुरु नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *