एकाधिकारशाही मोडीत काढून परिवर्तन पॅनलला साथ द्या- खा. चिखलीकर युतीच्या परिवर्तन पॅनलचे प्रचाराचे नारळ फुटले.

 

 

नांदेड प्रतिनिधी,दि.२४ :-  नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकाधिकारशाही असून ही एकाधिकारशाही मोडीत काढून युतीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मरळक ता.नांदेड येथील प्रचारसभेत सभेत रविवारी केले. भाजप सेना युतीच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचे नारळ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत फुटले असून यंदा परिवर्तन होणार कसा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.


नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात येत आहे. युतीच्या प्रचाराची पहिली सभा मरळक येथील महादेव मंदिर परिसरात घेण्यात आली. या प्रचार सभेला खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी तात्या पावडे होते. पॅनलमधील सर्व उमेदवारांच्या परिचय करून देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने नांदेड जिल्ह्यात अभुतपुर्व असे विकासाची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सुमारे साडे सहा हजार कोटींचा निधी मंजूर झाला असून कामे सुरु आहेत.

 

 

 

 

 

 

 

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून एकाधिकारशाही सुरू आहे. सामान्य मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवून आणले त्याच प्रमाणे बाजार समितीत परिवर्तन करा असे आवाहन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

 

 

 

यावेळी खा.हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर आदींनी मार्गदर्शन करुन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंढारकर,

 

 

 

 

 

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, अॅड किशोर देशमुख,बंडू पावडे, मिलिंद देशमुख, उमेश मुंडे, शंकर मुतखलवार, व्यंकट मोकळे, डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, बालाजी पाटील पुणेगावकर, दिलीप कंदकुर्ते, अनिल पाटील बोरगावकर, संतोष शिरसागर , बालाजी स्वामी, संजय अंभोरे, बाबुराव हेंद्रे, प्रल्हाद इंगोले उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *