किनवट शहरात डेंग्यूने घातले थैमान !

किनवट शहरात डेंग्यूने थैमान घातले , सरकारी यंत्रणेचे मात्र डोळे बंद ?

किनवट प्रतिनिधी सी.एस .कागणे,दि. १९ ऑगस्ट :आज घडीस किनवट शहरात डेंगूने थैमान घातले आहे त्यामुळे शहरातील मुलं आजारी आहेत. ताप, खोकला, सर्दी, आणि पांढऱ्या पेशी कमी होने  अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत.                                                                         या बाबत सविस्तर वृत्त आहे की डेंगूने ग्रस्त होऊन किनवट शहरातील रुग्णालय रुग्णांनी भरले आहेत आणि काहींना आदिलाबाद, नांदेड सारख्या दुसऱ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. एका एका घरातील तीन ते चार व्यक्ती व मुले आजारी पडत आहेत एवढे असून देखील किनवट नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा, व आरोग्य विभागाच्या आरोग्य यंत्रणा, कूच कामी ठरत आहेत कोणत्याही प्रकारची फवारणी शहरात केली जात नसल्याचे दिसून येत आहे  व रोग प्रतिबंधक कारवाई करण्यात येत नसल्याने हा आजार अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे उपरोक्त दोन्ही यंत्रणा ह्या शहरातील नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू होण्याची वाट बघत आहेत का हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

असा ही  प्रश्न उपस्थित होत आहे किनवट नगरपरिषद मध्ये घन कचरा बाहेरगावचा असेल,  परंतु नगर परिषद मधील सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी हे गावचेच आहेत यांनी याकरिता उपायोजना करावी फक्त ठराविक भागात फवारणी करून झाली तर सर्व किनवट शहराची फवारणी होत नाही सगळे नागरिक राहतात त्या भावनेने नगर परिषद ने काम केले पाहिजे. घनकचरा व्यवस्थापनाचा गुत्तेदार करत नसेल तर, त्यावर सरकारी यंत्रणेने निर्बंध लावले पाहिजेत.

जनरल फंड वर्षाला १.५० कोटी रुपये शहरातील नागरिक विविध कराच्या स्वरूपात भरतात ते पैसे जातात कुठे? याचा हिशोब विचारणारी कोणती यंत्रणा आहे की नाही ? शहरात असे विविध प्रश्न्‍न शहरातील नागरिकांमध्ये आपापसात कुजबुजताना  दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *