कुंडलवाडी रुपेश साठे,दि.१९ : देशात व राज्यात सध्या कोरोणा (१९) ची तिसरी लहरच्या भीतीची दक्षता लक्षात घेऊन तसेच सध्या स्थितीत महाराष्ट्रात “डेल्टा पल्स वायरसचा” प्रार्दुभाव सुरू झाला असुन नगर परिषद प्रशासनाने जंतुनाशक फवारणी करून व तसेच शहर स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी.अन्यथा शहरातील नागरिकांच्या वतीने उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा एका निवेदनाव्दारे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना स्विकृत नगरसेवक पंढरी पुप्पलवार यांच्या वतीने देण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की,देशात व राज्यात सध्या कोरोणा (१९) ची तिसरी लहरच्या भीतीची दक्षता लक्षात घेऊन तसेच सध्या स्थितीत महाराष्ट्रात “डेल्टा पल्स वायरसचा” प्रार्दुभाव सुरू झाला असुन कुंडलवाडी शहरातील विविध प्रभागात डेंग्यूचे काही रुग्ण आढळले असून तसेच लहान मुलांना व वृद्धांना ताप,सर्दी,खोकला या रोगाची
साथ सुरू असून या गंभीर बाबींकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुंडलवाडी शहरातील विविध प्रभागातून जंतुनाशक फवारणी करुन शहरातील स्वच्छता संदर्भात जातीने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई व नियोजन न झाल्यास नागरिकांच्या वतीने उपोषणास बसण्यात येईल अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.