मुखेड हिब्बट देगलूर रोडवर खड्याचे साम्राज्य

या रस्त्याला कोणी वाली आहे ? गवकारयाच्या टाहों

मुखेड़ प्रतिनिधि ज्ञानेश्वर कागणे ,दि.२० : मुखेड हिब्बट देगलूर रोडवर खड्याचे साम्राज्य झाले असून या बाबत  सविस्तर वृत असे आहे की, मागील एक ते दिड वर्षापासून मुखेड हिब्बट देगलूर रोडचे काम चालु असून सध्या तांदळी ते केरूर, जामखेड ते धनज दरम्यानच्या रस्त्यावर अक्षरशः अंदाजे २ फुट खोलीचे खड्डे पडले आहेत.

सध्या पावसाळा सुरू असलयामुळे जिकडे तिकडे  पाणीच पाणी  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच खरीप हंगाम असल्याने शेतकरी शेतीस लागनारे साहित्य आनन्यासाठी मुखेड अथवा देगलूर येथे जात आसतात त्या त्यांना  शिवाय प्रयाय नाही.

अश्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस व्यवस्थापकाने बंद केल्याने व खाजगी वाहणे सुद्धा खड्डे असल्याने कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना दळणवळण करण्यासाठी गैरसोय होत असल्याचे  दिसून येते.


त्याचेच एक उदाहरण म्हणून मुखेड देगलूर रोडवर असलेली ही पाण्याखाली असलेली छायाचित्रे आहेत, नागरिकांना दळणवळणा साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे यात जिवाचा देखिल धोका वाढला आहे येवढा मोठ्ठा धोका असुन देखील ही बाब वरिष्टाच्या लक्षात कशी येत नाही देव जाणे पन ही कसरत करता करता काही अनर्थ होण्या आधी याकडे कोनी लक्ष देईल का अशी चर्चा नागरीकात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *