रेशीमगाठी..

 

 

भारतीय संस्कृतीमध्ये एक मान्यता आहे की लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. ज्यांच्या नशिबात जो योग असतो तोच नवरा किंवा ती बायको त्याला मिळते जर हे स्वर्गात या रेशीमगाठी बांधल्या जात असतील तर मग जो कोणी हे करत असेल त्याने आपले काम खरेच सुरेख केलेले आहे असे मला वाटते. समाजात राहताना बरेचदा लग्न कुंकू मुंडासे साखरपुडा सोयरीक पाळणा या कार्यक्रमाला जावं लागतं.

हे सर्व क्षण त्या त्या कुटुंबाचे आनंदाचे क्षण असतात सोयरी हे दोन वेगळ्या कुटुंबातील मुलांचे किंवा मुलीचे नातं जुळवण्याचा कार्यक्रम असतो अशा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. सुरुवातीला घरातील वरिष्ठा सोबत जात होतो पण काळ जसा पुढे सरकला माझ्या ओळखी वाढल्या आणि संपर्क मग घरातील वरीष्टाच्या आरोग्याच्या अडचणी वाढल्या तसा मी एकटाच हजर राहू लागलो. सुरुवातीला एक तटस्थ राहणारा मी सोयरीकी मध्ये नंतर प्रमुख भूमिका निभावु लागलो.

 

 

 

 

 

काही मित्रा सोबत त्यांच्यासाठी मुली पाहण्यासाठी मी गेलो. मला जसं कळालं तसा सल्ला मी त्यांना दिला. तरुणाईत काही मित्रांना प्रेमविवाह करण्याची मदत केली तरुण वयात धाडसाने मित्रांना प्रेमविवाह केलेली मदत . या बाबत आता विचार केल्यास छातीत धस्स होतं. काही अघटीत घडलं असतं तर अनर्थ घडला असता. पण ते सर्व प्रेम विवाह करणारे मित्र आज सुखी संसारात रमलेले बघून आनंदही होतो.

 

 

 

 

बऱ्याचदा मुलीचे किंवा मुलाचे लग्न करायचं ते कुटुंब ठरवत मग काही लोकांना आपल्या मुली किंवा मुलाविषयी कुटुंबातील लोक माहिती देतात. विशेष अशी काही माणसं सोयरीक करण्यात तरबेज असतात . यांचे एक विशेष कौशल्य असते.शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक परिस्थिती ,वय उंची, रंग या सगळ्यांचा विचार करून स्थळ सुचवण्यात येते आता बरीच वधू वर सूचक मंडळ ही आहेत.
कळत नकळत मी ही सोयरिक की जमवण्यात पुढाकार घेऊ लागलो.

 

 

 

 

थोडंसं माझं वय या कामासाठी कमी होतं तरुणांमुळे जोश कधी कधी आक्रमकता होती आणि रागही म्हणून मग मी माझा साथीदार म्हणून जीवनाचा अनुभव असलेल्या वयाने माझ्यापेक्षा वीस वर्ष मोठे असलेल्या व्यंकट पाटील यांना सोबत घेतलं एक निर्मळ मनाचा रांगडा पाटील वय जरी जास्त असलं तरी संपूर्ण निष्ठा व विश्वास माझ्यावर.

 

 

 

 

 

अनेकदा गावातील मंडळी माझ्याकडे मुलाची किंवा मुलीच्या विवाह संबंधात विचारणा करत. मित्र इंजिनियर ,डॉक्टर, शिक्षक, पत्रकार ,राजकारणी ,शेती करणारे त्यामुळे सर्व क्षेत्रातील बरीच माहिती मला होती. कुटुंबातही बहिणी मेहुणे भाचे तसेच सासरवाडीतील ही पाहुणे शिक्षण घेतलेले देश विदेशात विविध क्षेत्रात काम करणारे होते.

 

 

 

 

 

 

संपत्तीचे मूल्यांकन ,सामाजिक प्रतिष्ठा ,शिक्षण याचीही मला जाण निर्माण झाली होती. त्यामुळे मग ती सोयरीक किंवा ते नातं योग्य की अयोग्य हे मी व्यंकट पाटलाच्या साथीने ठरवत असत. एखादा मुलगा पुणे मुंबई बेंगलोरला काम करतो त्याला मुलगी द्यायची असेल तर मग मी माझ्या गावाकडील माणसांना सांगत असे की तो काय शिकला आहे ते विचारा त्यावरून मी सांगतो त्याची पगार.

 

 

 

 

ग्रामीण भागातील लोकांना तसेच मुलींना नौकरीवाला मुलगा असावा असेच वाटतं.याचा फायदा काही फसवी मंडळी घेण्याचा प्रयत्न करू लागली की मग त्या मुलीच्या बापाला मी सांगत नोकरीमध्ये विविध प्रकार आहेत सरकारी नोकरी असेल तर ठीक पण प्रायव्हेट कंपनीत नोकरी असेल तर मग आपल्याला त्या मुलाचे शिक्षण बघावं लागेल.

 

 

 

 

 

जो कोणी माझ्याकडे सोयरीकीचा सल्ला मागायला यायचा मी संपूर्ण निर्मळ मनाने कुठलाही स्वार्थ न ठेवता त्या माणसांना सांगायचं बऱ्याचदा माझा सल्ला माझी माणसं ऐकत पण कधी कधी त्यांना माझं पटत नसत.

 

 

 

 

त्यावेळी मात्र मी रागाला यायचं म्हणायचं अरे बाबा रानात गेले तर जमीन कळत नाही बाजारात गेले तर भाजीपाला कळत नाही .शंभर वर्षाचे पीक माणसं ओळखावी लागतात आणि माणसाला माणूस कळत नाही ‌माणसं ओळखणे हे फार कठिण.

 

 

 

 

कधी कधी मुलगा किंवा मुलीचा माझ्यावर इतका विश्वास असायचा की मी म्हणेल ती पूर्व दिशा मग मात्र मला भीती वाटायची आणि काळजीही अशा प्रसंगात मी माझ्या निर्मळ मनाला साथ घालत जेणेकरून वधू व वरा विषयी चा माझा निर्णय चुकू नये. आणि पुढचा त्यांचा संसार सुखाचा व्हावा.

 

 

 

 

रब्बीची पेरणी झाली आणि हळूहळू गुलाबी थंडीने आम्हाला अलगद कवेत घ्यायला सुरुवात केली. थंडीच्या दिवसात गावाकडे मुक्काम केला की मग रात्रीच्या वेळी जेवणानंतर ठिकाणावर शेकोटी पेटवायची त्याच्याभोवती मी आणि माझी माणसं बसायचं हे ठरलेलं होतं शेतशिवाराच्या कामाची, राजकारणाची ,सोयरीकिची, चर्चा रंगायची‌. आजही चर्चा रंगली होती ती सोयरीकिची .

 

 

 

 

 

व्यंकटराव बालाजीला म्हणत होते .कुठपर्यंत आल सोयरिकीच कुठे घोड आडलय. बालाजी सांगत होता ,काय करू पोरगा ऐकना चाललंय. मुलाला पोरगी पसंत नाही. तसा मी म्हणालो पोरगी का पसंत नाही आणि सोयरे कुठले. बालाजी सांगू लागला सोयरे जुनेच आहेत दोन एकर रान देतो म्हणू लागलेत पोराला होतयं म्हणून ही सगळी तडजोड.

 

 

 

 

 

 

माझी एक एकर पोराच्या सासुरवाडी ची दोन एकर पोरग ही काम धंदा करतेच की त्याची त्याला हिम्मत राहते पण पोरगं ना च म्हणून बसलय. व्यंकटराव म्हणाले बालाजी चांगला माणूस जुनं नातं आणि पोरग शहरात कामाला , त्यालाही एकच पोरगी म्हणून पोरीचा बाप तळमळ करू लागलाय.

 

 

 

 

 

 

बालाजी म्हणाला दोन रोज झाल पोरग आलय दादा तुम्ही सांगा त्याला पाठवून देतो. सोयरीक महाशिवरात्रीच्या महिन्यात आणि लग्न वैशाखात करू. मी म्हणालो बरं पाठवून तर दे मी विचारतो पुढचं नंतर ठरवू.

 

 

 

 

दोन दिवसानंतर बालाजी चा मुलगा माझ्याकडे आला तसे मी वेंकटराव ला बोलावून घेतलं आणि लग्नाचा विषय काढला. बालाजी चा मुलगा म्हणाला पोरगी काळी आहे व्यंकटराव म्हणाले होय रे पण तुझं काय या अंधारात उजेड पडले काय. नुसते माकड गुण ‌नंबर एक आहे पोरगी करून घे लय नाटक करू नको. बालाजी चा मुलगा म्हणाला व्यंकट मामा लग्न करून घे म्हणा पण पोरगी नंबर एक नाही.

 

 

 

 

 

मी म्हणालो पोरगी डावी आहे नंबर एक नाही पण आपण तरी कुठे नंबर एक आहोत. अरे आपल्याजवळ तरी काय आहे सारं जगणं हातावर माणसे चांगले आहेत जुने नातं आहे आणि थोडी जायजाद देणार आहेत.

 

 

बालाजी चा मुलगा म्हणाला होय ते बरोबर आहे पण मी म्हणालो पण बिन आता काही नाही अरे तुला कुठेतरी त्या जमिनीचा सहारा व्हावा आयुष्यात कुठे काही बिघडलं तर कोण आहे आपल्याला जमिनीचा तुकडा विकून तरी संकटाच्या बाहेर पडता येईल हाच विचार बालाजीचा. पटलं तर बघ. वेंकटराव म्हणाले सगळ्याच गोष्टी एकाच जागी भेटण्यात बेटा.

 

 

 

 

 

 

संसार हे सगळं आपल्यासारख्या गरीब माणसांना तडजोडीनच करावं लागतं. मी म्हणालो जोडीदार सुंदर असावा असं कुणाला वाटत नाही पण त्यापेक्षाही पुढे जाऊन महत्त्वाचे असते ते संसार आणि जीवन सुखी आणि आनंदी करणे आणि या जीवन प्रवासात एक योग्य साथीदार भेटन. बघ विचार कर आणि नंतर आम्हाला सांग.

 

 

 

 

 

बालाजीच्या मुलाला आमचं म्हणणं पटलं त्याने होकार ही मुलीला कळवला ठरल्याप्रमाणे सोयरीक झाली आणि वैशाखात लग्नाचा मुहूर्त ठरला.
बालाजी व्यंकटराव मला लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. मी व माझी पत्नी दोघे जोडीने लग्नाला यावं असं त्यांना वाटत होतं पण अडचण अशी होती त्याच दिवशी माझ्या पत्नीच्या माहेरकडे एक लग्न होतं.

 

 

 

 

 

मी तिला लग्नासाठी नाही तरी कसं म्हणणार तिच्या माहेरातल लग्न होतं. पण माझी इच्छा माझी पत्नी या बालाजीच्या मुलाच्या लग्नाला यावी अशीच होती. माझी तळमळ बघून माझी पत्नी म्हणाली मला कळते हो . आपण दोघे जाव अशीच तुमची इच्छा आहे. जाऊदे मी सांगते माझ्या माहेरी .आम्हा बाई लेकीचा असंच असतं एकदा का नवऱ्याची रेशीमगाठ बांधली गेली की मग संसारात आम्ही रमून जातो. सासरच आमचं माहेर होतं आणि माहेरच्या गाठी हळूहळू सैल होत जातात.

 

 

 

 

 

आम्ही जोडीने लग्नाला गेलो नवरदेव नवरीला आशीर्वाद दिले जेवण केलं निरोप घेऊ लागलो तसा मुलीचा बाप हात जोडून आमचे धन्यवाद मानत होता आणि म्हणत होता हे तुमच्या मूळ झालं .मी म्हणालो हे सर्व प्रारब्ध आणि संचिताच्या गोष्टी. रेशीमगाठी तर स्वर्गातच ठरतात तसा बालाजी म्हणाला पण इथे कोणीतरी बांधाव्या लागतात त्या नाजूक रेशीमगाठी.

@मी एक आनंदयात्री
राजू पाटील लच्छनकर

📞६३०४८७३७२४ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *