नांदेड प्रतिनिधी,दि.३० :- १०० पैकी ६४ वेळा भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या ” मन की बात ” हा कार्यक्रम विविध घटकासाठी आयोजित केला असून शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रवाशांना मिनरल वॉटर व चहा चे वाटप करण्यात आले.
कामगार, विद्यार्थी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सफाई कर्मचारी, क्रिडा रसिक, महिला, आरोग्य सेवक यांच्यासह विविध घटकासोबत दिलीप ठाकूर हे मन की बात हा कार्यक्रम घेतात . बस स्थानक नांदेड येथे “मन की बात, प्रवासी भाईयों के साथ ” हा सलग १७ वा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा चे रोहित पाटील, राजेशसिंह ठाकूर यांची समयोचीत भाषणे झाली.बस स्थानक प्रमुख यासीन खान,वाहतूक नियंत्रक दीपक मुदीराज, वृत्तपत्र विक्रेते दीपक योगी यांच्या हस्ते शेकडो प्रवाशांना पाणी बॉटल व चहा वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास वाडेकर यांनी तर आभार संतोष भारती यांनी केले.
दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत मन की बात चे ६४ कार्यक्रम घेतले असून यावेळेसचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र शिंदे, हेमंत टेलर,अंकुश जाधव , अरविंद लहाने, राजू वाघमारे, शेख मुखतार, कपिल सोनसळे,कपिल यादव,माधव लुटे यांनी परिश्रम घेतले.दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले.