केसीआर च्या फोटोला महिला कडून दुग्धाभिषेक

मदनुर प्रतिनिधी सोपानराव दंतुलवाड दि.२०: मदनूरमधील अंगणवाडी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तेलंगाना सी.एम. के.सी.आर. यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक केले या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की संरक्षण कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाच्या सर्व अंगणवाडी केंद्र कार्यकर्त्यांनी आज राज्य सरकारचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखररावांनी अंगणवाडी सेविकांना कमी वेतनावर आपले कुटुंब चालवणे अवघड झाल्यामुळे ते फारच संकटात सापडले होते , राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष दिले आणि त्यांचा पगार वाढवला, त्यामुळे गावातील कर्मचारी त्यांच्या या निर्णयामुळे अत्यंत खूष होऊन आज सकाळी मदनूर मंडळाच्या एकलारा (मोठा),  गावात राज्यातील सरकारचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या फोटो वर  दुग्धपान केले यावेळी मदनूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिनू पटेल, एकलार कर आणि अंगणवाडी केंद्राचे कार्यकर्ते आणि गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *