प्राचार्यांचे अभिभाषण
देगलूर प्रतिनिधी,दि.01 :-कला वाणिज्य शाखा घेणा-या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे मत प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी व्यक्त केले ते देगलूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील कला वाणिज्य शाखेतील इ अकरावी नवप्रवेशित विद्यार्थाचे स्वागत समारंभात अभिभाषणात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डाॅ.अनिल चिद्रावार क. म. उपप्राचार्य प्रा.उत्तम कुमार काबंळे होते प्रारंभी छ.राजर्षी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कला वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन विद्यार्थी सामाजिक भान व बांधीलकी जोपसत असतो त्याला स्पर्धा परिक्षेत यश मिळवून यश प्राप्त करता येते कला वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यानी कल वाढवावा यावेळी प्रास्ताविक पर्यवेक्षक एस एन पाटील यांनी केले.
कला वाणिज्य शाखेतील उपक्रमाची माहिती प्रा शिवचरण गुरूडे यांनी दिली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वानोळे संतोष तर आभार प्रा तुकाराम लागले यांनी मानले या कार्यक्रमास अकरावी कला वाणिज्य शाखेतील विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.