देगलूर प्रतिनिधी,दि.२८ :- राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे कामकाज “पेपरलेस” व “डिजिटल” करण्याच्या दृष्टीने शासनाने काही निर्णय घेतले असून, त्यासंदर्भात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी, नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत देगलूर येथे, श्री समर्थ
वाचनालयाच्या सभागृहात “”ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन संगणकीय प्रणाली तालुकास्तरीय कार्यशाळा”” आयोजित करण्यात आली होती.
ग्रंथालयाचे कामकाज अधिक कार्यक्षम व सुस्पष्ट करण्यासाठी शासनाला आधुनिक संगणक प्रणालीच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे मनोगत नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. अनिल
सूर्यवंशी यांनी व्यक्त करून, कार्यालयीन कामकाजात संगणकाचा वापर करण्याच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले, तालुक्यातील ग्रंथालय चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते, उमेशराव बापूराव जाधव हाळीकर यावेळी अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव संजय पाटील व नरसिंगराव कदम हे होते.
याप्रसंगी श्री समर्थ वाचनालयाचे सह ग्रंथपाल जयराम गुरुपवार यांनी संगणकाचे प्रात्यक्षिक सादर केले. ग्रंथपाल पुंडलिक कदम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लिपिक वैभवी पटवारी व विठ्ठल पुठ्ठेवार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरात नरसिंगराव पोळ, मठवाले सर, विलास दोसलवार, राठोड सर, कोसंबे आनंदराव, बालाजी पाटील नरंगल, गंगाधर पोतंगले, संजय मंदिलवार, किशन कजेवाड, मुंगडे सर, शीला भालेराव, एस.टी. पाटील, धर्माजी संजय, अंकुश वाघमारे, निलेश कांबळे, राजू शिंदे, पद्मनाभ अच्चेमवार, संजय पोकर्णे, दिगंबर काजळे, रमेश कावटवार, भालेराव सिद्धार्थ, वलकले, माधव
वद्दिलवार, पांचारे सर, भगवान महाराज, बाबू महाराज, माधवराव गुंडुरे, राम पाटील, डी.एम. सुकणे सर, रेनगुंटवार सर, व्यंकटराव, मुंगडे उमाकांत, यादव संगेवार, योगेश कोकणे, बारडवार दिलीप, राजगुलवार माधव इत्यादी ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.