मदनूर प्रतिनिधी,दि.०८ :- मदनूर पत्रकार नूतन कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. कमारेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळातील सर्व पत्रकार मार्केट कमेटी यथिल सभाग्रहात एकत्र आले होते. सकाळी ठीक १०.३० वा.सभेला सुरवात झाली
सर्व पत्रकारानी एका मताने आणि एका स्वराने आरमोरवार हान्मलू अध्यक्ष तर शिवाजीअप्पा उपाध्यक्ष आणि राजू अण्णा कोषांगार सचिव पदी राजेश्वर गौड़ सह सचिव बालाजी करेवार आणि सल्लागार एम. मनोहर, कृष्णा पटेल, रघु
आदि यांची निवड करण्यात आली या वेळी संगाअप्पा सोपान दंतुलवार,संदुरवार हन्मलू,बशीरसाब, नागेश पालेकर, तम्मेवार विनोद,साईलू संदूरवार, अमोल , आकुलवार पंढरी आणि डोंगळी मंडळातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
एकमेकाना मिठाई खाऊ भरवून जल्लोष व्यक्त केला नूतन अध्यक्ष यांनी आपल्या विचार प्रकट करताना ग्रामीण भागातील पत्रकारांचे सर्व अडचनी सोडवु आणि सर्व समस्या वर विचार विणीमर्श करूनच त्याचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. यावेळी सर्वानी आपआपले विचार मांडले चहा पान नंतर कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.