मरखेल प्रतिनिधी,दि. १४ :- मरखेल येथे साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उल्हासाने साजरी करण्यात आली.
दिनांक १३ आगस्ट् रोजी सकाळी १०:१५ वाजता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले.
माननिय सूरज जगताप डी. वाय.एस.पी मरखेल यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून व नारळ फोडुन पूजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मछिंद्रनाथ गवाले यांनी केले. या कार्यक्रमास उपसरपंच राजू पाटील आणि मधुकर लाखे सावकार, शंकरराव देशाई, मनोहरजी माली पाटील, पप्पूरेड्डी आणि गावातील सर्व समाजतील नेते व कार्यकर्ते आदीची उपस्थिती होती.
सर्वानी लोकशाहिर आन्ना भाऊ साठे यांचे जीवन चरित्रा वर आप आपले विचार मांडले आणि सायंकाळी ३:०० वाजता गाजेबाजे लाउन भव्य मिरवणूक काढण्यात आली .