आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त नांदेड तहसील येथे बालविवाह निर्मूलनाची सामूहिक शपथ
नांदेड दि. १२ :- बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक,

युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची उपस्थिती होती.
शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे.