जय दुर्गेश्वरी नवरात्र महोत्सव समिती करडखेड यांच्या वतीने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर धर्मसभेचे उद्‌घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते संपन्न.

 

 

नांदेड प्रतिनिधी दि.२२ :- जय दुर्गेश्वरी नवरात्र महोत्सव समिती करडखेड यांच्या वतीने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर धर्मसभेचे उद्‌घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

 

 

 

 

 

 

 

यांच्या हस्ते झाल्यानंतर कृष्णा देशमुख आणि शाम्भवी साले यांच्या तडाखेबंद भाषणाने धर्मसभेत सहभाग घेतलेले शेकडो गावकरी मंत्रमुग्ध झाले.

नवरात्रामध्ये करडखेड ता. देगलूर येथे
झालेल्या धर्मसभेपूर्वी ॲड. दिलीप ठाकूर, कृष्णा देशमुख आणि शाम्भवी साले यांची गावातून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दुर्गामाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजनानंतर दिप प्रज्वलनाने धर्मसभेची सुरुवात झाली.

 

 

 

 

 

 

 

 

उद्‌घाटनपर भाषणात दिलीप ठाकूर यांनी नवरात्र मंडळाच्या या नवीन उपक्रमाचे कौतूक केले. कृष्णा देशमुख यांनी जगात हिंदू धर्म टिकून रहावा याकाळी तरुणांनी दक्ष राहिले पाहिजे असा सल्ला दिला. शाम्भवी साले यांनी आपल्या भाषणातून लव्ह जिहाद विरुद्ध लढण्यासाठी तरुणींनी खंबीर राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. व्यासपिठावर गिरीष गोळे,कैलास

 

 

 

 

 

 

 

 

 

बंडगर,सरपंच सौ.राधाबाई शिळवणे.श्रीनिवास मंदीलवार, पंकज देशमुख, बालाजी लोलपे, अनिल मोरे,संदीप शिंदे,संतोष शिंदे, बालराज कडेवार,सुशांत जबडे,सतीश शिंदे,साईकिरण चिनगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी इबीतवार यांनी तर आभार समितीचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन

 

 

 

 

 

 

 

 

चीनगुलवार, माधव झुडपे,सचिन मोरे,नागनाथ चंदावाड यांनी परिश्रम घेतले.धर्मसभेला करडखेड परिसरखतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *