देगलूर प्रतिनिधी, पंकज सोनकांबळे दि.०१:- शहरा लगत असलेल्या बागन टाकळी गावांमध्ये जल जीवन मिशन चे काम करण्यासाठी ७४ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे व त्याचे टेंडर सुमित कन्स्ट्रक्शन यांना टेंडर
यांना सोडण्यात आले असता सदरील गुत्तेदारांनी काम न करता मौजे बागन टाकळी येथील आलेल्या कामाचे पैसे उचलून कोणतेही काम केलेले नाही.
सदरील कामाकडे गुत्तेदार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जवळपास एक दीड वर्षे झाले तरी कोणत्याही प्रकारचे काम बागन टाकळी या गावांमध्ये करण्यात आलेले नाही तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये काम हे पूर्ण झालेली आहे व काही गावांमध्ये कामे हे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत परंतु बागन टाकळी येथे कोणते काम चालू केलेले नाही.
शासनाला दाखवण्यासाठी एक गाळ काढण्यासाठी मशीन विहीरी जवळ आणून विहिरीतील गाळ एक ते दोन दोन टोपले काढून दाखवले आहे. व शासनाचा आलेला निधी उचल करण्यात आला आहे.
तसेच गावात पाईपलाईन न टाकता त्याचे पैसे उचलण्यात आलेले आहेत या कारणामुळे गावात काहीही काम न होता गावकऱ्यांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे तरी मेहेरबान साहेबांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन सदर गुत्तेदारांवर कारवाई करून व त्यांना देण्यात आलेला निधी वसूल करून दुसऱ्या गुत्तेदारांकडे
टेंडर देण्यात यावे असे पत्र गावातील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक शंकर रामराव आक्यमवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषद कार्यालय नांदेड यांच्याकडे देण्यात आले आहे.
तरी गावातील झालेल्या भ्रष्टाचाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी यासाठी अशा प्रकारे अर्ज देण्यात आले आहे.