नांदेड भाजपा महिला तर्फे देवेन्द्र भाऊ फडणवीस यांना राखी पाठवणार. सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर

 

सुनिल रामदासी नांदेड प्रतिनिधी दि : २३ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेन्द्र भाऊ फडणवीस याना नांदेड येथील भाजपा महिला आघाडी तर्फे राखी पाठवण्याचा उपकृम भाजपा म.उपाध्यक्षा सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर यानी हाती घेतला आहे.

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. रक्षाबंधन म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे.

भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रतिभावंत व्यक्तीमत्व म्हणून देवेन्द्रजी फडणवीस संबोधले जातात.मागील आपल्या सरकार मध्ये देवेन्द्रजी आनेक महिला साठी कायदे काढले.महिलाच्या आनेक ज्वलंन्त प्रश्न सोडवले. त्यामुळे आज आनेक महिला सुरक्षित झाल्या आहेत.यापुढेही तमाम महाराष्ट्रातील महिलाचे भाऊ म्हणून सक्षणकर्ते आपणच आहात. व लवकरच आपली इच्छा व मनोकामना पुर्ण व्हावी व पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले नेत्रत्व सर्वाना लाभावे निरोगी व उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे ह्याच मि एक बहिण म्हणून राखी बांधुन व सर्व महिलाच्या वतीने राखी पाठवून शुभेच्छा देते आशी भावना सौ.प्रणीता देवरे-चिखलीकर यानी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *