मुखेड प्रतिनिधीः ज्ञानेश्वर कागणे दि.२३ : मुखेड वैद्यकिय संस्थेची नुतन कार्यकारणी दि. २० ऑगस्ट रोजी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात वैद्यकीय संस्थेच्या अध्यक्षपदी त्वचा रोग तज्ञ डॉ. राहुल मुक्कावार तर सचिवपदी दंत रोग तज्ञ डॉ.पांडुरंग श्रीरामे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी मावळते अध्यक्ष डॉ. फारुक शेख व सचिव डॉ.प्रकाश पांचाळ यांना निरोप देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
तसेच नुतन अध्यक्ष व सचिव सह सर्व कार्यकारिणी चे वैद्यकीय संस्थेच्या वतीने अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय संस्थेचे मार्गदर्शक मराठवाडा भुषण डाॅ. दिलिप पुंडे,डाॅ. अशोक कौरवार, डाॅ. विरभद्र हिमगिरे,डाॅ. व्यंकट सुभेदार,डाॅ. माधव पाटील उच्चेकर, डाॅ. रामराव श्रीरामे,डाॅ. महेश पत्तेवार, डाॅ. प्रशांत खंडागळे,डाॅ.एम जे.इंगोले,डाॅ.आर.जी.स्वामी,डाॅ. प्रभाकर सितानगरे,डाॅ. सतिश धमने,डाॅ. माधवी सुभेदार,डाॅ. शारदा हिमगिरे,डाॅ. शोभा उच्चेकर,डाॅ. आश्विनी धमने,डाॅ. कैलाश चांडोळकर,डाॅ. अविनाश पाळेकर, डाॅ. सतिश बच्चेवार,डाॅ. अजय चौधरी, डाॅ. शिवसांब वडेर,डाॅ. पृश्विदास पत्की,डाॅ. प्रल्हाद नारलावार ,डाॅ. शिवानंद स्वामी,किशन इंगोले,गजानन बंडे,आदी उपस्थित होते.