मुखेड प्रतिनीधीः ज्ञानेश्वर कागणे,
मुखेड येथील मौजे हिब्बट येथे जवळपास तिन हजार च्या आसपास लोकसंख्या असुन गावात मोठ्या प्रमाणात तरुन सुशिक्षित वर्ग आहे तरूण वर्गात जवळपास प्रत्येकाजवळ स्मार्टफोन मोबाईल आले आहेत .
आलीकडच्या काळात विद्यार्थी शिक्षण घेन्यासाठी शहराकडे धाव घेताहेत तर काही नौकरीसाठी बाहेर गावी असतात अश्यातच संपर्काचे माध्यम असलेल्या मोबाईल ला नेटवर्क येईनासे झाले आहे नागरिक आपला जनसंपर्क टिकवून ठेवण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करतात आपल्या मुलांना संपर्क करन्यासाठी मोबाईल चा वापर करतात पन मागील काही दिवसापासून मोबाईल ला नेटवर्क येईनासे झाले आहे संपर्क होईनासा झाला आहे फोन लागत आहे तर आवाज जात नाही, तर केव्हा केव्हा फोनच लागत नाही.
कोरोना महामारीमुळे शालेय विद्यार्थ्यांना अॉनलाईन शिक्षण प्रनाली आली आहे शिक्षणाचा अॉनलाईन अभ्यास करन्यासाठी आपल्या पाल्यानी आपल्या मुलांना काबाड कस्टकरून महागडे मोबाईल घेऊन दिले आहेत कंपनीचे महागडे रिचार्ज करून दिले आहेत अश्या परीस्थिती सुध्दा कंपनी चे नेटवर्क मिळत नाही
गावचे प्रथम नागरिक संरपंच व कॉमन सर्व्हिस सेटर केंद्र चालक यांनी एअरटेल कंपनीचे जिल्हा मॉनेजर यांना पत्र लिहून सुद्धा कंपनी ने फक्त चौकशी करुन पाट फिरवली आहे आता यानंतर जर कंपनीने लवकरात लवकर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नेटवरची सुविधा सुरळीत न केल्यास गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर एअरटेल नेटवर्क कंपनीवाले काय दखल घेतात यावर गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.