हैदराबाद प्रतिनिधी,दि.१९:- २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथे श्रीराम लला म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा समारोह संपन्न होणार आहे.
त्या अनुषंगाने हैदराबाद येथील रामभक्ता साठी श्रीराम सेवा संघ (भाग्यनगर) हैदराबाद, यांच्या द्वारे आयोजित श्री राम कथा ज्ञान यज्ञ म्हणजेच राम कथेचे भव्य आयोजन आखले गेले आहे.
त्यासाठी प.पु.श्रद्धेय राष्ट्रसंत स्वामी श्री गोविंद देव गिरीजी कोषाध्यक्ष आयोध्या यांच्या अध्यक्षतेखाली श्री राम मंदिर अयोध्या येथील शिष्या डॉ. सुश्री शिल्पाजी हे स्वतः त्यांच्या सुमधुर वाणीने संगीतबद्ध राम कथा सांगणार असल्याचे समजते.
ही राम कथा दिनांक १६ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून 22 जानेवारी २०२४ रोजी समाप्त होणार आहे, व त्याच दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले गेले आहे.
हा कार्यक्रम राघवेंद्र स्वामी सेवा संघ शहा अली बंडा हैदराबाद येथे होणार आहे तरी सर्व रामभक्तांना तन मन धन लावून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेवा संघ भाग्यनगर हैदराबाद यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी पंडित नागोराव कुलकर्णी मो. नं. ९३९१०८८११७ व पंडित किशन महाराज जोशी मो.नं. ९५०२३५००८४ यांच्याशी संपर्क साधावा.