आरोग्य दायी हरभऱ्याची भाजी का खावी.

 

 

 

मित्रांनो आपणास माहिती आहे का? हरभरेच नव्हे तर हरभऱ्याची पालेभाजी ही आरोग्यासाठी तितकेच लाभदायक असते. त्यामुळे ही भाजी हमखास आपल्या आहारात घेतली पाहिजे.

 

 

 

 

कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. त्यामुळे मनुष्याची हाडे मजबूत होतात एवढेच नाही तर यातील काबोहायड्रेटमुळे भरपूर ऊर्जा मिळते तसेच कोलेस्टेरॉल

 

 

 

 

नसल्याने हार्टच्या आजारापासून ही भाजी आपला बचाव करते. हरभऱ्याची भाजी आरोग्यदायी म्हणून ओळखली जाते. या भाजीमध्ये फायबर्स चे प्रमाण अधिक असते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हरभरा भाजीतील कॉपर आणि झिंक मुळे त्वचेची चमक वाटते एवढेच नाही तर केस काळे व दाट होतात.

 

 

 

 

हरभऱ्याच्या भाजीमध्ये आर्यनचे प्रमाण नात इतर भाज्याच्या तुलनेत अधिक असते त्यामुळे रक्ताच्या कमतरते पासून बचाव होतो.

 

 

 

 

 

हरभरा भाजी या दिवसात विपुल प्रमाणात। उपलब्ध होते व स्वस्तात देखील मिळते त्यामुळे अशी गुणदायी भाजीचा समावेश आपल्या आहारात नक्की करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *